दि. 13/09/2025 रोजी झालेल्या प्रॉडक्ट डिझाईन या आंतरशालेय स्पर्धेमध्ये एस.पी.एम. इंग्लिश स्कूल शाळेने प्रथम क्रमांक प्राप्त करून पुन्हा एकदा यशाची मोहोर उमटवली आहे.
विद्यार्थ्यांमधील इन्फिनिटी थिंकिंग ला चालना देण्यासाठी प्रॉडक्ट डिझाईन ही स्पर्धा शि. प्र. मंडळीच्या एस.पी.एम. इंग्लिश स्कूल ने आयोजित केली होती. इयत्ता आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या या स्पर्धेत पुण्यातील आणि दापोलीतील एकूण दहा शाळांनी सहभाग घेतला.
लोकोपयोगी आणि उपयोगिता असणाऱ्या नवीन आणि नाविन्यपूर्ण उत्पादनाची संकल्पना तयार करून त्याची सर्व मांडणी व डिझाईन विद्यार्थ्यांनी सादर केली.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री. सुशांत जोशी (इंजिनीयर सीमेन्स कंपनी) व डॉ. प्रशांत दुराफे ( चीफ सायंटिफिक ऑफिसर एस. पी. मंडळी.) यांनी अतिशय मोलाची कामगिरी पार पाडली.
या स्पर्धेत
प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत -
एस. पी.एम. इंग्लिश स्कूल चे विद्यार्थी -
कु. रेवा कुलकर्णी
कु. आदित जोशी.
कु. अनिश घारपुरे .
द्वितीय क्रमांक पटकावला आहे कलमाडी शामराव हायस्कूल
तृतीय क्रमांक - महाराष्ट्र मंडळ हायस्कूल.
उत्पादनाची संकल्पना मांडणी आणि उपयोगिता या आधारावर सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शाळेला फिरता करंडक दिला जातो. त्या फिरत्या करंडकाचे मानकरी ठरले आहे-
एस.पी.एम. इंग्लिश स्कूल, पुणे-30
स्पर्धेतील विद्यार्थ्यांना अमृता आपटे या शिक्षिकेने मार्गदर्शन केले होते. मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी मॅडम, शाळेच्या समन्वयक रिटा कपूर, स्पर्धा समन्वयक मानसी भाटे यांचेही बहुमोल मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेसाठी शाळेतील विज्ञान विभागाच्या सर्व शिक्षकांनी अतिशय मेहनत घेतली होती. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापकांनी खूप खूप अभिनंदन केले.