सध्याच्या काळात प्रत्येकाचे आयुष्य सोशल मिडियाने व्यापून टाकले आहे. त्याचा वापर करण्याशिवाय गत्यंतर नाही. मात्र त्याचे धोके काय आणि किती प्रमाणात आहेत, हे समजून घेणे आवश्यक आहे. या विषयावर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी
'सायबर सुरक्षा' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यासाठी हेमंत देशमुख यांनी मार्गदर्शन केले. वाढत्या डिजिटलाइझेशन प्रत्येक क्षेत्रात असल्यामुळे त्याचा वापर करण्याकडे जागरूकता आणि योजकता असणे महत्वाचे आहे. आज सरसकट सर्व वयोगटातील व्यक्ती मोबाईल, इंटरनेट, विविध वेबसाईट वापरत आहेत. सोशल लाईफ इंटरॅक्टिव्ह या संस्थेने पंचवीस वेबसाईट लहान मुलांनी वापरू नयेत, असे सांगितले आहे. आपले वय लपवून अशा गोष्टींचा वापर केला तर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो, शिक्षा होऊ शकते. त्यामुळे वेबसाईट वापरत असताना काळजी घेणे गरजेचे आहे, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यावेळी अनेक पालकही उपस्थित होते.
भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या, त्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. तसेच इंडिजिनियस ब्रेन्स या संस्थेमार्फत मराठी शब्द रचना स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात आली. आंतरशालेय स्पर्धेसाठी सहा विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यातील विजेत्या व उपविजेत्या स्पर्धकांना बक्षीसे देण्यात आली.
शाळेच्या मुख्याध्यापक अनिता भोसले, उपमुख्याध्यापक जयंत टोले, पर्यवेक्षक अंजली गोरे, मंजुषा शेलूकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास देशपांडे यांनी केले.