एच. ए. स्कूल प्राथमिक विभागात शपथविधी व क्रीडा महोत्सव उद्घाटन

26 Sep 2025 17:54:43

एच. ए. स्कूल प्राथमिक विभागात शपथविधी व क्रीडा महोत्सव उद्घाटन
दिनांक 24 सप्टेंबर 2025
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक शाळेत आज क्रीडा महोत्सवास सुरुवात झाली. यामध्ये इयत्ता पहिली ते चौथीसाठी सांघिक व वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा जाधव यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून , क्रीडा ज्योतीचे पूजन करून इयत्ता चौथीच्या धावण्याच्या स्पर्धेला आज सुरुवात करण्यात आली. यामध्ये 100 मीटर धावणे व बॅटन रिले या दोन स्पर्धांनी सुरुवात करण्यात आली.
आज शाळेतील स्पर्धांमध्ये यशस्वी होऊन वर्गाचे नाव जसे उज्वल केले त्याचप्रमाणे पुढे होणाऱ्या आंतरशालेय स्पर्धांमध्येही यशस्वी व्हा, खूप सराव करा , सांघिक भावना जपा , आपल्या शाळेचे नाव उज्वल व मोठे झाल्यावर भारताचे नाव उज्वल करा ,असे मनोगत मुख्या. सुरेखा जाधव यांनी मांडले. क्रीडा स्पर्धांमध्ये इयत्ता चौथीसाठी धावणे , बॅटन रिले व सांघिक खेळ टेन पास, इयत्ता तिसरी साठी धावणे , कोन गोळा करणे व सांघिक खेळ लंगडी, इयत्ता दुसरी साठी धावणे ,लगोरी व सांघिक खेळ डॉजबॉल , इयत्ता पहिलीसाठी धावणे , कोन रेस व सांघिक खेळ खजिना शोधणे अशा विविध क्रीडा स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील आठवड्यावर या स्पर्धा चालणार आहेत.
क्रीडा शिक्षिका सोनाली घोरपडे यांनी माहिती सांगितली. समीक्षा इसवे यांनी सूत्रसंचालन केले.क्रीडा विभागातील शिक्षकांनी स्पर्धेचे आयोजन केले. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे , डॉ. श्री विठ्ठल मोरे यांनी मार्गदर्शन केले.

वार्तांकन
सौ. शहनाझ हेब्बाळकर
Powered By Sangraha 9.0