रमणबाग प्रशालेतील वीर गणेशोत्सव

04 Sep 2025 16:47:59
 
रमणबाग प्रशालेतील वीर गणेशोत्सव
रमणबाग प्रशालेतील वीर गणेशोत्सव
 
दर वर्षी प्रशालेत विविध संकल्पनेवर आधारित गणेशोत्सव साजरा केला जातो. या वर्षी २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत वीर गणेशोत्सव या संकल्पनेवर आधारित ऑपरेशन सिंदूर या विषयावर पर्यावरणपूरक अशी सुंदर सजावट प्रशालेत करण्यात आली. मागील वर्षी नववीत प्रथम आलेला विद्यार्थी वेदांत जोशी यांच्या हस्ते विधिवत गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. दररोज अथर्वशीर्ष पठण व आरती सर्व विद्यार्थ्यांनी म्हटली. वीर गणेशोत्सवाच्या कार्याध्यक्ष श्रीमती अनघा काकतकर व कार्योपाध्यक्ष ऋचा कुलकर्णी यांनी मुख्याध्यापक अनिता भोसले यांच्या मार्गदर्शनाने सर्व कार्यक्रमांचे नियोजन केले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी उत्सव काळामध्ये गणेशमूर्ती तयार करणे, हार तयार करणे, फॅन्सी ड्रेस, चित्रकला, चित्रोळी,आरती पाठांतर,रांगोळी अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. बक्षीस वितरण समारंभास माजी मुख्याध्यापक चारुता प्रभुदेसाई प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते ११० विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापक श्रीमती अनिता भोसले यांनी केले. यावेळी रेडिओ मिरचीचा आर जे प्रशालेचा माजी विद्यार्थी अधीश गबाले यांनी विद्यार्थ्यांकडून पर्यावरणासंबंधी प्रतिज्ञा म्हणून घेतली.
वीर गणेशोत्सवाचा सांगता समारंभ मंगळवार दिनांक २ सप्टेंबर रोजी पर्यावरणपूरक पद्धतीने प्रशालेतच करण्यात आला. प्रशालेचे माजी विद्यार्थी प्रदीप शुक्ल यांच्या हस्ते जल कुंभात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. रमणबाग युवा मंचाच्या वतीने ढोल ताशा पथकाचे वादन झाले. प्रमुख पाहुणे प्रदीप शुक्ल यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधताना शाळेचे नाव मोठे करा असा संदेश दिला.
या वेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक अनिता भोसले, उपमुख्याध्यापक जयंत टोले, पर्यवेक्षक अंजली गोरे, मंजुषा शेलूकर उपस्थित होेते. रमणबाग प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांच्या सहकार्याने वीर गणेशोत्सवाची सांगता अत्यंत उत्साहाने व आनंददायी वातावरणात झाली.
Powered By Sangraha 9.0