विद्यार्थ्यांनी घेतला शाळा चालविण्याचा अनुभव

04 Sep 2025 16:40:21

विद्यार्थ्यांनी घेतला शाळा चालविण्याचा अनुभव
 
शिक्षक दिनानिमित्ताने रमणबाग प्रशालेचे दैनंदिन कामकाज चालवण्याचा अनुभव, शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांनी घेतला. शाळा भरवण्याची घंटा देण्यापासून ते दररोजचा परिपाठ घेणे, वर्गावर्गांवर जाऊन शिक्षकांप्रमाणे अतिशय सराईतपणे शिकवणे सर्व काही विद्यार्थ्यांनी केले. या विद्यार्थ्यांमधून चांगले शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.
गुरुवार दि. ४ सप्टेंबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये, माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात, प्रशालेचे उपमुख्याध्यापक जयंत टोले, प्रतिभा जक्का,राधिका देशपांडे, सीमा ढोण या शिक्षकांना तसेच मुख्य लिपिक हनुमंत गाढवे या सर्वांना भाग्योदय उद्योग समूह गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
शाळेच्या १९७२च्या माजी विद्यार्थी संघाने शिक्षक गौरव पुरस्कार प्रायोजित केले होते.
शाळा समिती अध्यक्ष डॉक्टर शरद अगरखेडकर यांनी आपल्या मनोगतात रमणबागेच्या शिक्षक परंपरेविषयी गौरवोद्गार काढले.
मुख्याध्यापक अनिता भोसले, १९७२चे माजी विद्यार्थी नरेंद्र प्रधान यांनी आपल्या मनोगतात शिक्षक विद्यार्थ्यांसाठी करत असलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन आणि कृतज्ञता म्हणून हे पुरस्कार असल्याचे सांगितले.
पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष प्रवीण महामुनी, पर्यवेक्षक अंजली गोरे, मंजुषा शेलूकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यार्थी मुख्याध्यापक वेदांत जोशी याने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर विद्यार्थी शिक्षक कुशल शेलार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पालक शिक्षक संघाच्या वतीने सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेट वस्तू आणि गुलाबाचे फूल देऊन गौरविण्यात आले.
 
Powered By Sangraha 9.0