मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचे ओळख करुन देण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेमध्ये मंगळवार दिनांक ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनिता भोसले यांच्या संकल्पनेतून इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. शिक्षणविवेक मासिकाच्या कार्यकारी संपादक अर्चना कुडतरकर, प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई यांनी लेखन कार्यशाळेसाठी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या समारोपाच्या वेळी वर्तमानपत्रांचे कार्यकारी संपादक आवर्जून उपस्थित होते.सकाळ वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक पराग समुद्र,महाराष्ट्र टाईम्स वर्तमानपत्राच्या कार्यकारी संपादक श्रद्धा सिदिड, पुढारी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक दिगंबर दराडे
यावेळी उपस्थित होते.
आपल्या मनोगतात श्री पराग समुद्र यांनी प्रथमतः प्रशालेने पत्रकार दिन साजरा केला म्हणून शाळेचे आभार मानले. समुद्र यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात कसे करिअर करावे यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रशालेच्या पर्यवेक्षिका अंजली गोरे मंजुषा शेलूकर यांच्या मार्गदर्शनाने ही कार्यशाळा व पत्रकारदिन यशस्वी झाला.