डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल पिंपरी पूर्व प्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी दमदार सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला!

19 Jan 2026 15:07:34
h a school
🎉अभिनंदन ...अभिनंदन... अभिनंदन....
      डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल पिंपरी पूर्व प्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी दमदार सादरीकरण करून  प्रथम क्रमांक पटकावला🏆
      गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी संस्कार बाल जत्रा यांच्याद्वारे आयोजित बाल अभिनय समूह नृत्य स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत पूर्व प्राथमिक च्या मुलांनी आपले उत्तम रित्या सादरीकरण करुन प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव मिस यांच्या मार्गदर्शनाखाली यश प्राप्त झाले तसेच ज्येष्ठ शिक्षिका गोरे मिस व ज्येष्ठ शिक्षक डॉ.विठ्ठल मोरे सर यांचेही मोलाचे सहकार्य व प्रोत्साहन मिळाले.
हासत नाचत गाऊ गाणे आनंदाचे🎼 या गाण्यावर सादरीकरण केले. धनश्री पाटील मिस व मनीषा भिसे मिस यांनी मुलांना नृत्यासाठी मार्गदर्शन केले.
संस्कार प्रतिष्ठानाचे संस्थापक व अध्यक्ष श्री. डॉ. मोहन गायकवाड यांच्या हस्ते मुलांना प्रशस्तीपत्रक व गौरव चिन्ह देऊन कौतुक करण्यात आले.
      या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी या सर्वांचे सहकार्य लाभले.
एच. ए. स्कूल, पिंपरी
पूर्व - प्राथमिक विभाग
Powered By Sangraha 9.0