प्रजासत्ताक दिन रमणबाग प्रशालेत उत्साहात साजरा...

27 Jan 2026 16:58:25

ramanbaug prashala republic day
       ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेत शालासमिती अध्यक्ष डॉ. शरद अगरखेडकर आणि मुख्याध्यापक अनिता भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मुख्याध्यापक अनिता भोसले यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच सामाजिक भान जपावे आणि देशाच्या रक्षणासाठी कटिबद्ध रहावे,असा संदेश दिला.विद्यार्थ्यांनी ध्वजगीत व 'वेदमन्त्राहून आम्हा वन्द्य वन्द्य मातरम्' या समूहगीताचे गायन केले. संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. साक्षरतेची प्रतिज्ञा व शालेय प्रतिज्ञा सर्वांनी म्हटली.
आंतरराष्ट्रीय योगासन पटु शिवराज बोत्रे, खो-खो पटु वेदांत गायकवाड, नाट्यस्पर्धा विजेते प्रत्युष महामुनी, अमोघ कुलकर्णी आणि पोस्टर स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन करण्यात आले.यावेळी एनसीसी विभाग प्रमुख राजेंद्र पवार यांचा 'मेजर' हे पद मिळाल्याबद्दल, नाट्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल रवींद्र सातपुते यांचा सत्कार करण्यात आला.
यानिमित्त प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या कॅनव्हास पेंटिंगच्या प्रदर्शनाचे उद्घाटन देखील करण्यात आले.
प्रशालेच्या नाट्य विभागातर्फे समाजाला योगदान देणाऱ्या समाजसुधारकांना आणि क्रांतिवीरांना क्रांतिवीरांची वेशभूषा करुन मानवंदना देण्यात आली.
एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध संचलन केले. 'राष्ट्र प्रथम' या संकल्पनेवर आधारित विविध प्रात्यक्षिकांमध्ये घुंगुरकाठी, डंबेल्स, निशाण, एरोबिक्स इत्यादी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.
तसेच लेझीम ,योगासने यांचे देखील सादरीकरण प्रजासत्ताक दिनानिमित्त केले गेले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पवार यांनी केले. बक्षिसपात्र विद्यार्थ्यांची नावे दीप्ती डोळे यांनी वाचली. व्यासपीठावर पर्यवेक्षक अंजली गोरे, मंजुषा शेलूकर उपस्थित होते. सर्व शिक्षक, शिक्षकेतर, पालक प्रतिनिधी, पालक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता संपूर्ण 'वंदे मातरम्' ने केली गेली.
Powered By Sangraha 9.0