बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालयात ऑक्टोबर महिन्यातील शिक्षण विवेक अंकाचे विमोचन करण्यात आले.
यावेळी शिक्षण विवेकच्या प्रतिनिधी श्रीमती अनुराधा लाहोरकर यांनी मासिकाची माहिती देऊन त्यातील विविध उपक्रम व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या उपक्रमांचे महत्त्व विशद करत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिक्षण विवेक आयोजित ‘काव्य अभिवाचन’ स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. धनंजय गिराम, विभागप्रमुख श्री. रतन गिरी तसेच सर्व शिक्षकवृंदांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नितीन डोंगरे यांनी केले, तर श्रीमती फासे यांनी आभार मानले.