
दिनांक 26 नोव्हेंबर 2026
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक शाळेत आज विविध उपक्रमांनी उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका तनुजा तिकोने यांच्या संकल्पनेतून माहिती , गाणी , सादरीकरण याद्वारे विद्यार्थ्यांना समजेल अशा अगदी सोप्या सहज भाषेत संविधानाबद्दल मुलांना माहिती करून देण्यात आली. सर्वप्रथम प्रतिमा पूजन व संविधान पूजन करण्यात आले. अधिराज झेंडे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेशभूषेत आला होता. सुप्रिया गावडे यांनी मुलांना संविधान दिनाची माहिती व डॉक्टर बाबासाहेबांची गोष्ट सांगितली. कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे यांनी मार्गदर्शन केले. शाला समितीचे अध्यक्ष खेमराज रणपिसे यांनीही कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. समीक्षा इसवे यांनी सूत्रसंचालन केले. अनघा कडू , समीक्षा इसवे व रत्नाकर वरवडेकर यांनी समीक्षा इसवे यांचे स्वरचित गाणे गायले. सुरेखा भामरे यांनी संविधान दिनाच्या घोषणा दिल्या. संपूर्ण कार्यक्रमाची तयारी इयत्ता तिसरी च्या शिक्षकांनी केली. अशाप्रमाणे विविध उपक्रमांच्याद्वारे मुलांना संविधानाची माहिती करून देण्यात आली.
वार्तांकन
शहनाझ हेब्बाळकर