दिनांक 4 नोव्हेंबर 2026
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेत आज उत्साहपूर्ण वातावरणात दिवाळी साजरी करण्यात आली. यासाठी संपूर्ण शाळा आकाश कंदील लावून सजविण्यात आली होती. प्रत्येक इयत्तेला दिवाळीचे दिवस वाटून देण्यात आले होते. कार्यक्रमात दिवाळीच्या वसुबारस , धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, पाडवा व भाऊबीज या प्रत्येक दिवसाचे महत्त्व , माहिती व नाट्यीकरण करून दाखविण्यात आले. यावेळी दिवाळीनिमित्त घेण्यात आलेल्या किल्ले बनविणे , रांगोळी स्पर्धा , भेटकार्ड बनविणे स्पर्धा ,पणतीची सजावट करणे स्पर्धा अशा विविध स्पर्धा मधील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या केंद्र समन्वयक नीता खाडे मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. मुलांनी दिवाळीनिमित्त बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका तनुजा तिकोने यांच्या संकल्पनेतून , ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे , डॉ.श्री. विठ्ठल मोरे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वीपणे साजरा करण्यात आला.शाळा समितीचे अध्यक्ष श्री खेमराज रणपिसे यांनी दिवाळीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना स्वतः बनविलेले भेटकार्ड देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी आवाजाचे फटाके उडवणार नाही व ध्वनी प्रदूषण करणार नाही अशी विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. राजश्री भालेराव यांनी सूत्रसंचालन केले . समीक्षा इसवे ,अनघा कडू रत्नाकर वरवडेकर यांनी गाणी गायली. तसेच यावेळी दिवाळीनिमित्त शाळेकडून सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये शिशुवर्ग ते चौथी चे सर्व शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.