जीवन उजळू वंचितांचे,
औचित्य दीपोत्सवाचे !
मान. मुख्या. सौ प्रतिभा गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाने सामाजिक बांधिलकी अंतर्गत एक हात मदतीचा हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. बालपणापासून मुलांना देण्याची सवय लागावी या उद्देशाने प्रत्येक वर्गातून जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य गोळा करण्यात आले. या उपक्रमाला पालकांनीही भरभरून प्रतिसाद दिला.
दीपोत्सवात आपण असीम आनंदाची अनुभुती घेतो. प्रत्येक घरात फटाके, खाऊ, अत्तर, आवडीचे, नवे कपडे अशी रेलचेल असते. परंतू यावेळी आपल्याच समाजातील अनेक बंधु-भगिनी, खास करून बालके या आनंदापासून वंचित असतात. त्यात विविध संस्थामधून राहणारी विशेष गरजा असणारे बालक. त्यांच्या आनंदात एक हात मदतीचा देऊन आपण सहभाग घ्यावा यासाठी अनाम प्रेम या संस्थेतील बालकांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
या संस्थेच्या प्रमुख सौ माने मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीचे कौतुक केले.