कौशल्य मेळाव्यातून विद्यार्थ्यांच्या उद्योजकतेला नवी दिशा!"

शिक्षण विवेक    05-Nov-2026
Total Views |
des
पुणे, दि.४ नोव्हेंबर : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या
एन.ई.एम.एस शाळेत व्यावसायिक शिक्षणांतर्गत आयोजित करण्यात आलेला 'कौशल्य मेळावा' हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मेळाव्याचे उद्धाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
इयत्ता ६वी व ७वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम सत्रात सजीव आधारित, साहित्य व यंत्र आधारित व मानवी सेवा या तीन प्रकारातील प्रकल्प निवडण्यात आले होते. यात हॅबिटॅट गार्डन,फेस्टिव किट तयार करणे,अग्निविरहित स्वयंपाक, मॅक्रेम वस्तू तयार करणे,( गाठीचे विणकाम) इव्हेंट मॅनेजमेंट इत्यादींचा समावेश होता.
या प्रकल्पांचा अंतिम टप्पा म्हणून कौशल्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये इयत्ता ६वी व ७वी च्या विद्यार्थ्यांनी विविध वस्तूंचे प्रदर्शन मांडले व विक्री केली. 'फेस्टिव्ह किट' अंतर्गत विद्यार्थ्यांनी हाताने रंगविलेल्या पणत्या, मातीची बोळकी,आकर्षक OHP रांगोळी,उदबत्ती स्टॅन्ड इत्यादी वस्तूंचा समावेश होता. तसेच मॅक्रेमच्या काही सुंदर वस्तू मेळाव्यात विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या. ह्यात किचेन , बुक मार्क इत्यादी वस्तूंचा समावेश होता.त्याचबरोबर खाद्य पदार्थांचे स्टॉल देखील ठेवण्यात आले होते. यात सँडविच,मटकी भेळ,पापडी चाट,पाणीपुरी, विविध पेये याचा समावेश होता.या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन, संघभावना, व्यावसायिक दृष्टिकोन आणि उद्योजकतेची बीजे रुजवणे हा होता.विद्यार्थ्यांना स्वतः तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात भर पडली.
विद्यार्थ्यांना या उपक्रमातून तयार केलेल्या वस्तूची किंमत कशी ठरवायची, नफा-तोटा कसा काढायचा, वस्तूंची- पदार्थांची आकर्षण मांडणी,गटात कार्य कसे करायचे हे सर्व शिकता आले.
तयार केलेल्या सर्व वस्तूंची विक्री झाली व उत्तम प्रतिसाद मिळाला त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील प्रोत्साहन मिळाले.या संपूर्ण मेळाव्यास पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी,पालकांनी कौतुक केले.
मुलांनी तयार केलेले सुंदर हॅबिटॅट गार्डन देखील सर्वांना त्यानिमित्ताने पाहता आले.
प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती हेमांगी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी व इव्हेंट मॅनेजमेंट च्या विद्यार्थ्यांनी उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले.