
श्री केशवराज माध्यमिक विद्यालय,लातूर येथे मे २०२६ महिन्यातील शिक्षणविवेक अंकाचे विमोचन दि.१ मे २०२६ वार शुक्रवार रोजी करण्यात आले.महाराष्ट्र दिन कार्यक्रम प्रसंगी केशवराज स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष धनंजय तुंगीकर सर,भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य श्री.संजय गुरव सर,शालेय समितीचे सदस्य श्री.नरेंद्र पाठक सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बालासाहेब केंद्रे सर,केंद्रीय विद्यासभा संयोजक तथा उपमुख्याध्यापक श्री.महेश कस्तुरे सर,विज्ञान विषय शिक्षक श्री.मोरेश्वर देशपांडे सर, तसेच विद्यार्थी आयुष माळशेटे यांची उपस्थिती होती.मे महिन्यातील शिक्षणविवेक अंकात सानवी पवार हिचे चित्र(७वी ) व आयुष माळशेटे (७वी) शिक्षणाची किंमत... लेख हे साहित्य छापून आले.या साहित्यिक विद्यार्थ्यांचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले.