दि.१५ जून २०२६ वार - सोमवार रोजी *शि. प्र. मंडळीच्या मराठी माध्यम, निगडी शाळेत* विद्यार्थ्यांचा *प्रवेशोत्सव* मोठ्या उत्साहाने करण्यात आला.
विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी प्रभावी, दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शाळेतील विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने शाळेमध्ये विविध उपक्रम सुरु करण्याचे नियोजन केले आहे. उदाहरणार्थ *R.S.P, लाठी -काठी, घोष पथक, गीतमंच, ढोल पथक, कब - बुलबुल*.
आपली संस्कृती व परंपरा जपत *सरस्वती पूजन* करून विद्यार्थ्यांचे *औक्षण* करून,सकाळच्या आनंददायी वातावरणात सर्व विद्यार्थ्यांचे *ढोल व ताश्याच्या तालावर जल्लोषात* स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून यमुनानगर प्रभागातील नगरसेवक *मा.प्रा. उत्तमजी केंदळे*,माजी नगरसेवक *मा. सचिन चिखले*, पालक शिक्षक संघाचे पालक चिटणीस *मा. श्री सोपन मेकले*, पालक प्रतिनिधी *मा. सौ.मंजुश्री अनुशे* उपस्थित होते.
प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून *नवीन उपक्रमासाठी उपयुक्त अशा वाद्यांचे व तसेच शस्त्रांचे* उपस्थित प्रमुख पाहूणे व विद्यार्थी यांच्या हस्ते *पूजन* करण्यात आले. आनंददायी वातावरणात शालेय परिपाठ घेण्यात आला त्यामध्ये *राष्ट्रगीत राज्यगीत,प्रतिज्ञा, प्रार्थना, गणपती अथर्वशीर्ष व श्यामची आई या पुस्तकाचा परिचय विद्यार्थ्यांना* करून देण्यात आला.
शाळेतील उपस्थित *प्रमुख पाहुणे,मा.मुख्यध्यापिका व सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी* यांनी सर्व विद्यार्थी यांना *नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा* दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील सांस्कृतिक प्रमुख *सौ.मोनिका बोरसे* यांनी केले.
शाळा समिती अध्यक्ष *मा.राघव अष्टेकर* यांच्या प्रेरणेतून शाळेच्या *मा. मुख्याध्यापिका सविता बिराजदार* यांच्या मार्गदर्शनाने तसेच सर्व *शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक व* यांच्या उपस्थितीत *विद्यार्थी प्रवेशोत्सव* अतिशय प्रसन्न व आनंददायी वातावरणात संपन्न झाला.