दिनांक 29 जुलै 2026
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक शाळेत आज शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेतून व्यासपोर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेनिमित्त आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या गुरूचे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येक वर्गातील एका विद्यार्थ्याने आपल्या वर्ग शिक्षकांचे पूजन करून त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी यावेळी मुख्याध्यापिकांनी आपल्या मनोगत मुलांना घरी जाऊन आई-बाबा आजी-आजोबा यांची पूजा करायची आहे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत व रोजच शाळेत येताना घरातल्या मोठ्या व्यक्तींच्या पाया पडून दिवसाला सुरुवात करायची असे सांगितले.
शुभांगी गवारी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुरेखा भामरे यांनी मुलांना गुरुपौर्णिमेची माहिती सांगितली .यावेळी पूर्व प्राथमिक विभागाचे विद्यार्थी गुरु शिष्यांच्या पारंपरिक जोड्यांमध्ये, त्यांच्या वेशभूषेमध्ये आले होते .यामध्ये गुरु सांदीपनी शिष्य श्रीकृष्ण , गुरु द्रोणाचार्य शिष्य अर्जुन, गुरु जिजाबाई शिष्य शिवबा , गुरु महात्मा फुले शिष्य सावित्रीबाई फुले , गुरु रामकृष्ण परमहंस शिष्य स्वामी विवेकानंद , गुरु रमाकांत आचरेकर शिष्य सचिन तेंडुलकर हे शाळेमध्ये अवतरले होते. धनश्री पाटील यांनी या गुरु शिष्यांच्या जोड्यांची माहिती सांगितली .शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका अर्चना गोरे व डॉ. श्री विठ्ठल मोरे यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले. समीक्षा इसवे, अनिता येनगुल, धनश्री पाटील व अनघा कडू यांनी आईच्या सन्मानासाठी विविध गौरव गीते गाऊन कार्यक्रमाला सुरेल साथ दिली. रत्नाकर वरवडेकर यांनी वाद्यांची साथ दिली. शहनाझ हेब्बाळकर यांनी आभार मानले.
*शब्दांकन*
सौ. शहनाझ हेब्बाळकर