पुणे: “विद्यार्थ्यांनी सतत अभ्यास, वाचन, परिश्रम घेतले पाहिजे.आदर्श नागरिक झाले पाहिजे.”,असे सांगून मुलेचं आपल्या देशाचं भवितव्य असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त उपायुक्त सरदार पाटील यांनी केले. गुरुपौर्णिमेनिमित्त ३१ जुलै २०२६ रोजी टिळक मार्ग येथील डी.ई.एस. सेकंडरी शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरदार पाटील, लोकेश दास, शाळेच्या मुख्याध्यापिका विजया जोशी, उपमुख्याध्यापिका लक्ष्मी मालेपाटी, पर्यवेक्षिका राधा केतकर, काजल चौधरी,पालक संघांच्या उपाध्यक्षा ज्योती
असनीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यकमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. हर्षदा कारेकर यांनी विद्यार्थ्यांसह गुरुवंदना गीत सादर केले. प्रास्ताविक विजया जोशी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय राधा केतकर यांनी करून दिला. या प्रसंगी एस.एस.सी बोर्डामध्ये व पाचवी, सातवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.त्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. पाटील यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत असताना बालपणीच्या आठवणी सांगितल्या.शिवाय स्वच्छता, पर्यावरण, इच्छाशक्तीचे महत्त्वही सांगितले.
यावेळी लोकेश दास यांनीही मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.पूर्वा आपटे, मंजुषा भोसले, पूर्णिमा धुलप , अदिती पवार यांनी गुणवंत विद्यार्थी नाव यादीचे वाचन केले. सूत्रसंचालन सायली सोमण तर ज्योती असनीकर यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी विजया जोशी यांच्या मार्गदर्शनात उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले.
राघवेंद्र रामकृष्ण गणेशपुरे
शिक्षक डी. ई. एस. सेकंडरी स्कूल, टिळक मार्ग, पुणे ३०