सातारा : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा, सातारा येथील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सन २०२५-२६ च्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली.
या परीक्षेत चि. प्रचेतन प्रद्युम्न गोडबोले याने महाराष्ट्र राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ८ वा क्रमांक, जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत ४ था क्रमांक, तर तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली.
सातारा जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या शाळेच्या एकूण ८ विद्यार्थ्यांची निवड झाली. यामध्ये चि. प्रचेतन प्रद्युम्न गोडबोले, चि. कार्तिक चेतन कदम, कु. सान्वी निरंजन बोकील, चि. शार्विल सौरभ जोशी, चि. आरुष सुशील लिपाणे, चि. स्वानंद सचिन वाघ, कु. आयुषी मल्हारी आडके आणि चि. कार्तिक विक्रमसिंह पवार यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, शालासमिती अध्यक्ष मा. श्री. सारंग कोल्हापुरे, शालासमिती सदस्य मा. श्री. अनंत जोशी, मा. श्री. अमित कुलकर्णी, मा. श्री. नितीन पोरे, मुख्याध्यापिका सौ. तनुजा तिकोने, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती मनीषा चव्हाण आणि शिष्यवृत्ती विभाग प्रमुख सौ. रेहाना डांगे यांनी अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना सौ. सीमा घाटगे, सौ. मंगल साळुंखे, सौ. रेहाना डांगे, सौ. सारिका लामकाने, श्री. मनोज राठोड आणि सौ. शितल ढमाळ यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेतील सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांचेही अभिनंदन करण्यात आले.
विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे उल्लेखनीय यश संपादन करता आले, अशी भावना शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.