सामाजिक पर्यावरण पूरक रक्षाबंधन

शिक्षण विवेक    28-Aug-2026
Total Views |
mes
 
बरसली वर्षा सजली सृष्टी,
नव सजीवांना मिळाली दृष्टी,
रक्षण करण्या सदा दक्ष,
मित्र आहेत आपले वृक्ष.
वृक्ष देते सजीवांना श्वास,
मनी ठेवूया हीच आस, करूया वृक्ष रक्षाबंधन खास.
सामाजिक पर्यावरण पूरक रक्षाबंधन
गुरुवार दिनांक 27/8/2026 म. ए. सो. बाल शिक्षण मंदिर डे. जि. पुणे 4 या शाळेतील इयत्ता चौथीचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक, शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या समवेत सामाजिक पर्यावरण पूरक रक्षाबंधन साजरे करण्यासाठी संभाजी उद्यान येथे गेले होते.त्यावेळी शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ. मोनिका खेडलेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले,त्यावेळेस सौ. तनुजा सोनपाटकी यांनी वृक्ष प्रतिज्ञा सांगितली.उपस्थित सर्वांनी प्रतिज्ञा घेतली.. तसेच तेथील वृक्षांना स्वहस्ते तयार केलेल्या पर्यावरण पूरक राख्या बांधण्यात आल्या. तेथे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील विदयार्थ्यांनी राखी बांधली. यावेळी विद्यार्थ्यांना झाडांविषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमासाठी लायन्स क्लबचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना खाऊ दिला.शाळेने विदयार्थ्यांना, पालकांना खाऊ दिला.खूप आनंदात व उत्साहात पर्यावरण पूरक रक्षाबंधन साजरे करण्यात आले.