माझी आई

शिक्षण विवेक    22-Sep-2026
Total Views |

Am 

माझ्या आईचे नाव सौ. विदुला प्रमोद शेट्टीगार आहे. माझ्या आईचा स्वभाव नेहमी काही तरी चांगले काम करत राहणे आहे. माझी आई एक कर्तव्यदक्ष गृहिणी आणि समाजसेविका आहे. माझी आई सकाळी पाच वाजता उठून मला आणि बाबांना डबा देते. आम्हा दोघा भावंडांना ती अत्यंत लाडाने सांभाळते, पण अभ्यासाच्या बाबतीत तिची शिस्त कडक आहे. संध्याकाळी शुभंकरोती झाली की, ती आम्हांला अभ्यास पूर्ण करायला सांगते. अभ्यास झाला की, आमच्या सोबत थोडा वेळ गप्पा मारते. मग आम्ही अन्नपूर्णा मातेचा श्लोक म्हणून भोजन आरंभ करतो, जे तीनेच शिकवले आहेत. माझ्या आईला वाचनाची प्रचंड आवड आहे. तिने मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील बऱ्याच पुस्तकांचे वाचन केले आहे. आमच्या सोसायटीमध्ये तिने माझ्या मित्रासोबत 'वाचनकट्टा' असा नवीन उपक्रम सुरू केला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

माझ्या आईने खूप ठिकाणी सावरकर आणि टिळकांवर निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेतलेली आहे. वेगवेगळ्या शाळेत जाऊन सावरकर कोण होते?, 'गणपती बाप्पा मोरया' या जयघोषांत 'मोरया' असेच का म्हणतात, त्यांची गोष्ट सांगते.

एकदा मी माझ्या आईला विचारले की, तुझ्या आयुष्यातील सर्वांत मोठे बक्षीस कोणते आहे? तेव्हा तिने मला सांगितले, लोकमान्य टिळकांचे पणतू आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू यांची प्रत्यक्ष भेट हेच माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठे बक्षीस आहे.

नाव - ऋषिकेश प्रमोद शेट्टीगार
शाळेचे नाव - महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ
इयत्ता - ७ वी तुकडी ब