सोमवार दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित एच्.ए.स्कूल पूर्व प्रा.विभागात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
माननीय मुख्याध्यापिका सौ. तनुजा तिकोने मिस यांच्या हस्ते गणेशाचे पूजन करण्यात आले. तसेच मुख्याध्यापिका सौ. तिकोने मिस व ज्येष्ठ शिक्षक गोरे मिस व डॉ. मोरे सर यांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली.
सौ.वैशाली निचित यांनी मुलांना माहिती सांगितली.
पृथ्वी प्रदक्षिणा या गोष्टीचे नाट्यीकरण आमच्या बालचमूंनी सादर केले.
आमच्या बालचमूंना सौ. वैशाली व सौ. मनिषा मिस यांनी मार्गदर्शन केले.
गणेशोत्सवाचे औचित्य साधून आमच्या मुलांनी विविध नृत्याचे सादरीकरण केले.
तसेच अनायरा शिंगाडे या विद्यार्थीने गोष्ट सांगितली.
सर्व मुलांना प्रसाद देण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. धनश्री पाटील यांनी केले.