Enter your Email Address to subscribe to our newsletters
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
नमस्कार मित्रमैत्रिणींनो ! सगळ्या वयोगटाचे मित्रमैत्रिणी यात आले बरं का! ही वेबसाईट आहे, विद्यार्थी- शिक्षक आणि पालक यांच्यासाठी. आपण सगळेच यातल्या कोणत्या ना कोणत्या नात्याचा बंध घेऊन जगत असतो. त्या आधारावरच आपण 'मोठे' होत असतो. त्यामुळे ही वेबसाईट आपल्या सगळ्यांचीच आहे, म्हणून प्रत्येकालाच ही वेबसाईट वाचायला आवडणार आहे. आपल्या अस्तित्त्वाची जाण झाल्यापासून जगताना सतत सुरु असतं ते शिकणं, हे पुन्हा एकदा नव्याने अनुभवता येईल www.shikshanvivek.com वर! एवढंच नाही, तर इथे तुम्हाला या शिकण्याविषयी लिहिताही येणार
आमच्या शाळेला जाणारा रस्ता म्हणजे तंतोतंत रस्ताच आहे झालं. तुम्ही जर त्या रस्त्यावरून जाल तर म्हणाल की रस्ता आहे की सोंग? म्हणजे घरातून निघा, उजवीकडे वळा आणि सरळ चालू लागा, तिथे तुम्हाला एक मोठ्ठा खड्डा दिसेल, शेजारी ढीगभर माती उपसून ठेवली असेल. मग तुम्ही त्या मातीच्या ढिगाशेजारून सावकाश चालत जाल तर समोर एका मोठ्या घराशी दोन अल्सेशियन कुत्री बांधून दिसतात.
प्रचंड लोकसंख्येचा देश असूनही भारतात अजून कोरोनाला बेताल मुसंडी मारता आलेली नाही आणि मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही नगण्य आहे. साधनांचा तुटवडा किंवा सुविधांची मारामार असतानाही मोदींनी भारताला त्या संकटातून सावरून धरलेले आहे. कारण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन केलेली कारवाई भारताच्या पथ्यावर पडली आहे आणि त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेही मोदींचे गुणगान केलेले आहे.
आजकाल लोकं पुस्तकं वाचणं विसरूनच गेले आहेत का असं वाटतं. हल्ली पुस्तकांवरची धूळ साफ करण्यासाठी सुद्धा बऱ्याचजणांना वेळ उरला नाहीये मग पुस्तकं वाचण्याचा विषय लांबच. जेव्हा केव्हा लोकांना वेळ मिळेल तेव्हा ते मोबाईलमध्येच गर्क असतात आणि मुलंही मोबाईलमधील गेम्स आणि वेगवेगळ्या एप्समध्ये मग्न असतात.
थंडीचे दिवस म्हटलं म्हणजे थंडगार हवा. मनमुराद भटकंती, हिरवागार निसर्ग असे टवटवीत दिवस डोळ्यांसमोर येतात. या दिवसात भूकही भरपूर लागते. कित्येकजण व्यायामाचा श्रीगणेशा हिवाळ्यातच करतात. एकंदरीत वातावरण आरोग्याला पोषक असतं.